Verification: 4e7838d05962b884

गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यासाठी धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

Spread the love

Wheat flour Policy : गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यासाठी संबंधित धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. मंजूरीनंतर, गव्हाच्या पिठाच्या ( Wheat flour ) निर्यातीवर निर्बंध घालण्यात येतील, ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील पिठाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवता येईल आणि समाजातील दुर्बल घटकांना अन्न सुरक्षा मिळेल.

NPIC 2022825171217 1
Wheat flour Policy

रशिया ( Rusia ) आणि युक्रेन ( Ukren ) हे गव्हाचे ( wheat ) जगातील सर्वात मोठे निर्यातदार आहेत आणि एक चतुर्थांश गव्हाचा पुरवठा करतात. या दोघांमधील संघर्षाचा परिणाम गव्हाच्या पुरवठ्यावर झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय गव्हाची मागणी वाढली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात गव्हाचे भाव वाढले आहेत. देशातील 140 कोटी लोकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी यावर्षी मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती.

भारतीय गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या पिठाची मागणी वाढली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते जुलै या कालावधीत गव्हाच्या पिठाच्या निर्यातीत दोनशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही पिठाच्या किमतीत वाढ झाली आहे. ( Restrict the export of wheat flour )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ