Verification: 4e7838d05962b884

India vs Australia 3rd ODI : भारत विजयाची गुढी उभारणार ? भारतासाठी करो या मरो !

Spread the love

मालिका जिंकण्याचे आव्हान, आज तिसरा सामना India vs Australia

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अंतीम सामना आज होणार आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. कारण यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे.

gudhi
India vs Australia 3rd ODI

भारत ( India ) आणि ऑस्ट्रेलिया ( Australia ) यांच्यात खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 5 गडी राखून विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने शानदार पुनरागमन करत सामना 10 गडी राखून जिंकला. मालिका १-१ ने बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांमधील या मालिकेतील निर्णायक सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

मधल्या काळात आयपीएलसह ( IPL ) इतर देशांच्याही ट्वेण्टी-२० ( T20 )लीग आहेत. त्यामुळे एकदिवसीय सामने खेळण्याची संधी आवश्यक त्या प्रमाणात मिळणार नाही. सध्या भारताचे ४४ सामन्यांतून ११४ तर ऑस्ट्रेलियाचे ३२ सामन्यांतून ११२ गुण झाले आहेत. भारताने सामना जिंकला तर त्यांची गुणसंख्या ११५ होईल, पण दुर्दैवाने जर सामना गमावला तर ऑस्ट्रेलिया संघ भारताला हटवून अव्वल स्थानावर झेप घेईल.

चेन्नईच्या ( Chennai ) एमए चिदंबरम स्टेडियमवर ( M A Chidambaram Stadium ) खेळल्या जाणार्‍या या महत्त्वाच्या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल सांगायचे तर, येथील फिरकी गोलंदाजांना खूप मदत झाली आहे. या मैदानावर दीर्घ कालावधीनंतर एकदिवसीय सामना ( One Day Match ) खेळला जात असला तरी, अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो जेणेकरून खेळपट्टीचा अचूक अंदाज लावता येईल.

Joine WhatsApp for daily update

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

%d bloggers like this: