Verification: 4e7838d05962b884

चीनी ( China) ५४ मोबाईल अॅप्सवर ( Apps ) बंदी..!

Spread the love

आयटी IT कायद्यानुसार केली कारवाई

चीनी ( China) ५४ मोबाईल अॅप्सवर ( Apps ) बंदी..!
Chinis App Banned

सीमेवर भारत-चीन लष्करादरम्यान तणावाची स्थिती कायम असताना भारत सरकारने पुन्हा एकदा चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’ केला आहे. सरकारने ५४ चिनी स्मार्टफोन अॅप्सवर देशात बंदी घातली आहे. यामध्ये ‘गरेना फ्री फायर’ आणि ‘अॅपलॉक’ हे अॅप्सही समावेश आहे. आयटी अधिनियमाच्या कलम ६९ अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. याआधी भारताने चीनच्या बऱ्याच ॲपवर बंदी घातली होती.

यापूर्वी ५९ चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी

त्यामध्ये ‘टिकटॉक’, ‘व्हीचॅट’ आणि ‘हॅलो’ यांचा समावेश आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससह ५९ चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती. गरेना फ्री फायर हे अॅप यापूर्वीच गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. याविषयी ‘गरेना इंटरनॅशनल’कडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

भारतीय युजर्सचा डेटा लीक

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने बंदीचा हा निर्णय घेतला आहे. हे सर्व अॅप्स चीनसह अन्य देशांत भारतीय युजर्सचा डेटा (माहिती) पाठविण्याचा गुन्हा करत होते. गुगल प्ले स्टोअरने तत्काळ भारत सरकारच्या आदेशांचे पालन करून हे अॅप्स हटवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!