Verification: 4e7838d05962b884

Father of all bombs | फादर ऑफ ऑल बॉम्बफादर ऑफ ऑल बॉम्ब

Spread the love

General Purpose bomb

रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या सुरू असलेल्या युद्धामध्ये अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे आणि बॉम्बचा वापर केल्याचे निदर्शनास आले. त्यात रशियाच्या फादर ऑफ ऑल बॉम्ब‘ची Father of all bombs मोठी चर्चा झाली. भारतानेही असाच एक संहारक बॉम्ब तयार केला आहे. ५०० किलो वजनाचा हा ‘महाबॉम्ब’ आहे. शत्रू देशातील कोणत्याही विमानतळाला काही क्षणांमध्येच उद्ध्वस्त करण्याची क्षमता या महाबॉम्बमध्ये आहे. जनरल पर्पज बॉम्ब General Purpose bomb असे याचे नाव ठेवण्यात आले आहे. असे ४८ बॉम्ब भारतीय वायुसेनेच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.

That is the structure of the bomb | अशी आहे बॉम्बची रचना

Jounaral Purpous bomb
Jounaral Purpous bomb

हा भारताचा सर्वात मोठा बॉम्ब आहे.

५०० किलो वजन तसेच १.९ मीटर लांबी

जग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांद्वारे हा बॉम्ब वाहून नेता येऊ शकतो.

Who made the bomb? | बॉम्ब बनवला कोणी ?

■ जबलपूरच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये हा महाबॉम्ब बनविण्यात आला आहे.

बॉम्बची संपूर्ण रचना आणि उत्पादन याच ठिकाणी झाले आहे.

What is the mechanism of action of a bomb? | बॉम्बची कार्यपद्धती काय?

■ एखादे मोठे विमानतळ काही क्षणांमध्येच पूर्णपणे उडविण्याची क्षमता या महाबॉम्बमध्ये आहे.

एका बॉम्बमध्ये १५ मिमी व्यासाचे १० हजार ३०० स्टीलचे छोटे बॉम्ब आहेत.

एक लहान बॉम्ब ५० ते १०० मीटर अंतरापर्यंत विखुरला जातो.

प्रत्येक गोळ्यात १२ एमएम जाडीची स्टील प्लेट भेदण्याची क्षमता आहे.

■ या बॉम्बचा प्रचंड मोठा स्फोट होतो. परिणामी शत्रूचे मोठे नुकसान होईल.

शत्रूची बंकर्स, रेल्वे ट्रॅक व मोठे पूल उडविण्यासाठी महाबॉम्ब उपयोगी ठरणार आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!