Verification: 4e7838d05962b884

चीनचा हॅकर पांडाचा hacker Panda भारताला ताप..!

Spread the love

Chinese hacker Panda’s fever in India ..!

सायबर विश्वात हॅकिंग हा त्यातला हॉट विषय. जगभरात हॅकर्सचे ग्रुप असतात. हे हॅकर्स कुठे ना कुठे तरी सक्रिय असतातच. असाच एक हॅकर्स ग्रुप बऱ्याच दिवसांनंतर सक्रिय बनला आहे. ‘डीप पांडा’ असे या ग्रुपचे नाव असून त्याचे उगमस्थान चीन आहे.

Who is Deep Panda? डीप पांडा कोण ?

Chinese hacker Pand
Chinese hacker Pand

डीप पांडा हा चिनी हॅकर्सचा ग्रुप आहे. या ग्रुपने काही वर्षांपूर्वी भारतासह इतर अनेक जागतिक संस्थांवर सायबर हल्ला केला होता. पुन्हा सक्रिय बनलेल्या डीप पांडा हॅकर्स ग्रुपने गेल्या महिन्यापासून आर्थिक क्षेत्र, पर्यटन आणि सौंदर्यप्रसाधने या क्षेत्राशी संबंधित उद्योगांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

Evidence obtained by cyber experts | सायबर तज्ज्ञांना मिळाले पुरावे –

गेल्या महिन्यात फोर्टिगार्ड लॅब्सच्या संशोधकांनी एका चिनी हॅकिंग ग्रुपद्वारे केल्या जात असलेल्या कारवायांचा छडा लावण्याची मोहीम हाती घेतली होती.

हा ग्रुप दशकभरापासून अधिक काळ सक्रिय होता. हा ग्रुप समूह डेटा चोरी तसेच पाळत ठेवण्यासाठी सरकारच्या संरक्षण, आरोग्य, दूरसंचार आणि आर्थिक संस्थांना लक्ष्य करीत असतो. फॉरेन्सिक चाचणीनंतर असे काही पुरावे समोर आले की, ज्यातून डीप पांडा पुन्हा सक्रिय बनल्याचे स्पष्ट झाले.

Background of Indo-China conflict | भारत-चीन संघर्षाची पार्श्वभूमी –

भारत व चीन यांच्यात तणाव वाढला असताना, भारताच्या पॉवर ग्रीडसह इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांविरोधात चीन समर्थ हॅकर्स ग्रुपने मोहीम उघडल्याचे सुरक्षा तज्ज्ञांच्या निदर्शनास आले होते.

मे २०२० मध्ये दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असताना या गटांकडून भारतातील १२ संस्थांना लक्ष्य करण्यात आले होते. यात १० वीज उत्पादन आणि वहन केंद्रांचा समावेश होता.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!