भारताच्या विजय अमृतराज ( Vijay Amrutraj ) यांना टेनिस क्षेत्रातील योगदानासाठी 2021 चा गोल्डन पुरस्कार घोषित झाला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशासन, शिक्षण आदी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्याला आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम आणि आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशच्या वतीनं प्रत्येकवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
लंडनमध्ये अमृतराज यांच्या सन्मानार्थ विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. जागतिक स्तरावर त्यांनी व्यावसायिक खेळाडू म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
