Verification: 4e7838d05962b884

स्टार्टअप ( Startup ) आणि युनिकॉर्नच्या ( Unicorn ) संख्येत भारत जगात तिसरा

Spread the love

स्टार्टअप्स ( Startup ) आणि युनिकॉर्नच्या ( Unicorn ) संख्येच्या बाबतीत भारत ( India ) जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, सध्या भारतात 105 युनिकॉर्न आहेत, त्यापैकी 2021 मध्ये 44 आणि 2022 मध्ये 19 ची स्थापना झाली आहे.

दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे डीएसटी स्टार्टअप उत्सव सोहळ्याला संबोधित करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, हे दशक भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमात मोठे बदल घडवून आणू शकते. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या ( 75th year of India’s independence ) वर्षी स्टार्टअप्सची संख्या 75 हजार झाली आहे. हे स्टार्टअप्स केवळ महानगरांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये नाहीत तर ते छोट्या शहरांमध्येही स्थापन झाले आहेत. 49 % स्टार्टअप टियर II आणि III शहरांमध्ये आहेत.

download 4
STATUP iNDIA

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ