Verification: 4e7838d05962b884

आर्क्टिक गेल्या 40 वर्षांमध्ये चार पट वेगाने गरम ( Arctic warmed )

Spread the love

आर्क्टिक गेल्या 40 वर्षांमध्ये चार पट वेगाने गरम झाल्याचे एका नवीन संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे. आर्क्टिक मागील 40 वर्षांमध्ये उर्वरित ग्रहापेक्षा सुमारे चार पट वेगाने गरम झाले आहे. 2019 मध्ये यूएन क्लायमेट सायन्स पॅनेलच्या मागील अंदाजापेक्षा हे खूप जास्त आहे. ( Arctic warmed )

हवामानशास्त्र संस्थेतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अलिकडच्या दशकात उत्तर ध्रुवाभोवती तापमानात वाढ होण्याचा दर उर्वरित ग्रहापेक्षा चार पटीने जास्त होता. 1979 पासून आर्क्टिकमधील तापमानाचे त्यांचे विश्लेषण सादर करताना, संशोधकांनी सांगितले की, या प्रदेशातील काही भाग, विशेषतः नॉर्वे आणि रशियाच्या उत्तरेकडील बॅरेंट्स समुद्र सातपट वेगाने गरम होत आहेत.

NPIC 202281210552
The Arctic warmed nearly four times faster than the rest of the planet in the past 40 years

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ