Verification: 4e7838d05962b884

Indo-German Partnership : हरित आणि शाश्वत विकासासाठी

Spread the love

हरित आणि शाश्वत विकास भागीदारी स्थापन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi आणि जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली.

Indo-German Partnership
Indo-German

भागीदारीचे ध्येय काय आहे ?

द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढवणे आणि हवामान संरक्षणाच्या दिशेने कृती गतिमान करणे.

जर्मनीकडून किती आर्थिक मदत दिली जाईल ?

या भागीदारी अंतर्गत, जर्मनीने German भारतातील हवामान बदलाशी संबंधित प्रकल्पांमध्ये €10 अब्ज गुंतविणार आहे. ही रक्कम 2030 पर्यंत गुंतवली जाईल.

ग्रीन हायड्रोजनवर भारत-जर्मनी करार –

ग्रीन हायड्रोजनवरील भारत-जर्मनी Indo-German करारामुळे हरित हायड्रोजनचे उत्पादन, वापर, साठवण आणि वितरण यामध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी “इंडो-जर्मन ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्स” स्थापन करण्यात येईल.

ग्रीन हायड्रोजन Green Hydrogen म्हणजे काय ?

ग्रीन हायड्रोजनची व्याख्या हायड्रोजन अशी केली जाते जे पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजित करून सौर किंवा पवन उर्जा सारख्या अक्षय ऊर्जा वापरून तयार केले जाते. हायड्रोजन जळल्यावर फक्त पाणी उत्सर्जित करत असल्याने, ते जीवाश्म इंधनासाठी संभाव्य पर्याय म्हणून मानले जात आहे.

भारत हरित ऊर्जेच्या उत्पादनाला कसा प्रोत्साहन देत आहे ?

केंद्राने 2030 पर्यंत 5 दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकारने फेब्रुवारी 2022 मध्ये जाहीर केलेल्या ‘ग्रीन हायड्रोजन’ धोरणानुसार, ग्रीन हायड्रोजन किंवा अमोनियाचे उत्पादक पॉवर एक्सचेंजमधून अक्षय ऊर्जा खरेदी करू शकतात. अशा उत्पादकांचे आंतरराज्य प्रसारण शुल्क 25 वर्षांसाठी माफ केले आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking