Verification: 4e7838d05962b884

NDA उमेदवार जगदीप धनखड यांची 14 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड

Spread the love

जगदीप धनखड ( Jagdeep Dhankhard ) हे देशाचे १४ वे उपराष्ट्रपती असतील. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा ( Margaret Alva ) यांच्यापेक्षा ३४६ मते जास्त मिळाली. लोकसभेचे महासचिव आणि निवडणूक अधिकारी उत्पल कुमार सिंह यांनी संसद भवनात पत्रकारांना सांगितले की, 780 मतांपैकी श्री धनखर यांना 528 आणि श्रीमती मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. 15 मते अवैध असल्याचे त्यांनी सांगितले. जनता दल युनायटेड, वायएसआरसीपी, बहुजन समाज पार्टी, अखिल भारतीय अण्णा द्रमुक आणि तेलुगु देसम पार्टी यांनी जगदीप धनखड यांना पाठिंबा दिला. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना आम आदमी पार्टी, टीआरएस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचा पाठिंबा मिळाला आहे. तृणमूल काँग्रेसने निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता.

विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू ( M Venkaiah Naidu ) यांचा कार्यकाळ या महिन्याच्या १० तारखेला संपत आहे.

NPIC 202286212438

.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ