Verification: 4e7838d05962b884

IPL : पुण्यात पॅट कमिन्सचे वादळ घोंगावले..!|KKR win by 5 wickets with 24 balls to spare

Spread the love

अष्टपैलू पॅट कमिन्सचे (नाबाद ५६) पुण्यात वादळ घोंगावले. त्याने अवघ्या १४ चेंडूत आयपीएलमधील दुसऱ्या वेगवान अर्धशतकाची नोंद करत केकेआरला मुंबई इंडियन्सवर अद्याप २४ चेंडून बाकी असताना ५ विकेटने विजय मिळवून दिला. सलामीवीर वेंकटेश अय्यरनही नाबाद अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मुंबईला मात्र सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सूर्यकुमार यादवची (५२) खेळी मात्र व्यर्थ ठरली.

विजयासाठी १६२ धावांचे टार्गे ट असताना केकेआरने १६ षटकांत ५ विकेटस् गमावून १६२ धावा काढत विजय मिळविला. वेंकटेश अयर व अजिंक्य रहाणे यांनी केकआरच्या डावास संथ सुरुवात करताना १६ धावांची सलामी दिली. मात्र टायमल मिल्सने केकेआरला पहिला धक्का देताना रहाणेला (७) झेलबाद केले. त्यानंतर वेंकटेश अय्यर व श्रेयस अय्यर जोडी केकेआरला सावरणार असे वाटत असतानाच सॅम्सला चौकार खेचण्याच्या प्रयत्नात कर्णधार श्रेयसने (१०) तिलक वर्माकडे झेल दिला.

वेंकटेश अयर व सॅम बिलिंग्ज यांनी आठव्या षटकात केकेआरचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, बिलिंग्जला १७ धावांवर एम. अश्विनने झेलबाद करत मोठा अडसर दूर केला. भरवशाचा फलंदाज नितीश राणाही अवघ्या ८ धावांवर परतला. तर धोकादायक रसेल (११) बाद झाला.

एका बाजूने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या वेंकटेश अय्यरने आपले अर्धशतक ४१ चेंडूंत ६ चौकार व एक षटकाराच्या मदतीने पूर्ण केले.

याचवेळी पॅट कमिन्सने डॅनिएल सॅम्सच्या गोलंदाजीवर हल्ला चढवून त्याच्या एकाच षटकात ३५ धावा कुटल्या. याबरोबरच त्याने अवघ्या १४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. वेगवान अर्धशतकाची बरोबरी करत केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शेवटी कमिन्स ५६ तर वेंकटेश अयर ५० धावांवर नाबाद राहिले. मुंबईच्या वतीने टायमल मिल्स व एम. आश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १६१ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर इशान किशन व डेवॉल्ड ब्रेविस यांनी संथ फलंदाजी करत संघाला ४५ धावांपर्यंत पोहोचवले. याचवेळी ब्रेविसला (२९) वरुणने बाद केले. इशान किशनला (१४) पॅट कमिन्सने बाद केले.

सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या जोडीने चौथ्या विकेटसाठी ३४ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. तर सूर्यकुमारने आपले अर्धशतक ३४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने पूर्ण केले. त्याने तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार ५२ धावांवर बाद झाला. दुसऱ्या बाजूने तिलक वर्माने शानदार फलंदाजी करत २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३८ धावा काढल्या शेवटच्या षटकात पोलार्डने ३ षटकार खेचत ५ चेंडूंत नाबाद २२ धावा काढल्याने मुंबईने २० षटकांत ४ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारली. केकेआरच्या वतीने कमिन्सने २ तर उमेश यादव व चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!