Verification: 4e7838d05962b884

Ujjain : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या महाकाल लोक संकुलाचे उद्घाटन

Spread the love

Ujjain : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उज्जैन येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर ( Mahakaleshwar Mandir ) परिसरात महाकाल लोक संकुलाचे उद्घाटन केले. मोदींनी पंधरा फूट उंच शिवलिंगावरील आवरण रिमोटच्या सहाय्याने काढून महाकालेश्वर मंदिर राष्ट्राला समर्पित केले. त्यांनी पदयात्रा काढून विविध कामांची माहिती घेतली. यानंतर पंतप्रधानांनी इलेक्ट्रिक वाहनातून महाकाल गार्डनलाही भेट दिली. उद्घाटन कार्यक्रमात विविध राज्यातील 750 लोककलाकारांनी आपली कला सादर केली.

पंतप्रधान मोदींनी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास श्री महाकालेश्वर मंदिरात पोहोचून पूर्ण श्रद्धेने महाकालाची आरती केली. उद्घाटन समारंभाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्यपाल मंगूभाई पटेल आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील उपस्थित होते.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

Web Title: Prime Minister Narendra Modi inaugurates the Mahakal Lok Complex of Mahakaleshwar Temple in Ujjain, Madhya Pradesh
Peruse Most recent Marathi News Titles of Maharashtra, Live Marathi Fresh insight about Mumbai, Pune, Governmental issues, Money, Amusement, Sports, Occupations, Way of life at Rajenews.com. To Get Reports on Versatile, Android and iOS. Morning now on all virtual entertainment stages. Follow us on Wire, Facebook, Twitter, Offer Visit and Instagram for the most recent updates and furthermore buy into our YouTube Channel English Raje News today.