Verification: 4e7838d05962b884

IPL 2022 PBKS Vs RCB: 205 धावा करूनही RCB कसा हरला ?

Spread the love

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला RCB या मोसमातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला पंजाब किंग्जने PBKS आरसीबीला ५ विकेट्स राखून पराभव केले

हायलाइट्स –

IPL 2022 PBKS Vs RCB: 205 धावा करूनही RCB कसा हरला ?
IPL 2022 PBKS Vs RCB

रविवारी संध्याकाळी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये एक जबरदस्त सामना खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यातील या सामन्यात पंजाबने विजय मिळवला. आरसीबीने डोंगराएवढी 205 धावांची खेळी केली पण त्यानंतरही संघाचा पराभव झाला.

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 205 धावा केल्या. आरसीबीचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिसने संथ सुरुवातीनंतर वेग पकडला आणि 57 चेंडूत 88 धावा केल्या. फॅफने आपल्या खेळीत 7 षटकार ठोकले. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 29 चेंडूत 41 आणि दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 32 धावा केल्या. या स्फोटक खेळीच्या जोरावर आरसीबीने 20 षटकांत 205 धावा केल्या.

पंजाबची सुरुवात चांगली झाली

पंजाब किंग्जलाही चांगली सुरुवात झाली आणि कर्णधार मयंक अग्रवाल, शिखर धवन या जोडीने बंगळुरूच्या गोलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली. कर्णधार मयंक अग्रवालने 24 चेंडूत 32 धावा, शिखर धवनने 29 चेंडूत 43 धावा केल्या. भानुका राजपक्षेनेही 22 चेंडूत 43 धावा केल्या. पण पंजाबचा खरा खेळ ओडियन स्मिथ आणि शाहरुख खान यांनी फिरवला.

झेल सुटला आणि मग सामनाही हुकला

पंजाबला 24 चेंडूत 44 धावांची गरज असताना त्याच षटकात ओडियन स्मिथचा झेल सुटला. यानंतर पंजाब किंग्जला 18 चेंडूत 36 धावांची गरज होती. 18 व्या षटकातच ओडियन स्मिथने फटकेबाजी करत 25 धावा लुटल्या. त्यानंतर ओडियनने या षटकात 3 षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात पंजाबचा विजय निश्चित झाला आणि शेवटी शाहरुख खाननेही एक षटकार, एक चौकार लगावला.

पंजाब किंग्जने असा जिंकला सामना

• १७ वे षटक – ८ धावा
• १८ वे षटक – २५ धावा
• 19 वे षटक – 13 धावा

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!