Verification: 4e7838d05962b884

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती

Spread the love

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये राज्य सरकारनं केलेल्या दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे.

सरकारने 4 ऑगस्ट रोजी अध्यादेश जारी केला आहे. त्‍यानुसार जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) सदस्यांच्या पदसंख्येत बदल करण्यात आला आहे. तसेच आरक्षणाच्या प्रक्रियेला देखील स्थगिती देण्यात आली आहे.

25 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 284 पंचायत समितीच्या आरक्षणाबाबत अंतिम अधिसूचना जारी होणार होती. तसंच 13 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या ( Panchayat Committees ) केंद्रनिहाय मतदार याद्या 8 ऑगस्टला प्रकाशित होणार होत्या. या अंतर्गत येणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या मतदार याद्यांचा प्रारूप आराखडा 10 ऑगस्टला प्रकाशित होणार होता मात्र या प्रक्रियेला स्थगिती दिली असून याबाबत आदेश लवकरच जारी केले जाणार आहेत. ( Suspension of election process of Zilla Parishad and Panchayat Committees )

NPIC 202286203110
Election process of Zilla Parishad and Panchayat Committees

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ