Verification: 4e7838d05962b884

भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी | Approval for the second and third phase of India Biotech nasal vaccine

Spread the love

RajeNews_13th_August_2021

bharat

भारत बायोटेकने नाकावाटे लस घेण्यात येणारी लस बरनविली आहे. त्यासाठी DBT-BIRAC ची मदत घेण्यात आली. त्यातील पहिल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नियामक मंडळाने मंजुरी दिली आहे.

 BIRAC म्हणजे जैव तंत्रज्ञान विभाग आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल. कोरानाच्या जागतिक संकटाविरुद्धच्या लढाईत BIRAC अग्रेसर आहेत. त्यांनी एकत्रितपणे लस विकास, निदान, औषध पुनर्वापर, उपचार आणि चाचणीसाठी संशोधन आणि विकास प्रयत्नांना गती देण्याची रणनीती तयार केली आहे. या लसींच्या  विकासाला  जैवतंत्रज्ञान विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

कोविड -19 लस विकासाच्या प्रयत्नांना प्रोत्याहन देण्यासाठी तसेच गती देण्यासाठी मिशन ‘कोविड सुरक्षा’ सुरू करण्यात आले होते. आत्मनिर्भर भारत यावर भर देऊन नागरिकांना सुरक्षित, प्रभावी, परवडणारी आणि सुगम्य  कोविड -19 प्रतिबंधक लस लवकरात लवकर तयार करण्याचा उद्देश होता. त्यामध्ये उपलब्ध  संसाधनांना  एकत्रित करुण हे अभियान पार पाडण्याचे लक्ष ठरविण्यात आले.

भारत बायोटेकने तयार केलेल्या लसीचे नाव इंट्रानेसल आहे. ही लस नाकावाटे दिली जाते. तसेच तिच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला  नियामक मंडळाकडुन मान्यता मिळाली आहे. आत्तामर्यंतच्या लसींमध्ये भारतात मानवी क्लिनिकल चाचण्याना सामोरी जाणारी ही पहिलीच कोविड -19 प्रतिबंधक लस ठरली आहे.  तसेच BBV154 ही इंट्रानॅसल रेप्लीकेशन-डेफिसिएंट  चिंपांझी एडेनोव्हायरस SARS-CoV-2 लस आहे. बीबीआयकडे  अमेरिकेतील सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठाचे  परवानाधारक तंत्रज्ञान आहे.

18 ते 60 वर्षे वयोगटातल्या व्यक्तींवर  पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. या पहिल्या चाचणीत  निरोगी स्वयंसेवकांना या लसीचा कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. असे कंपनीने  स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर यावेळी कोणतीही गंभीर घटना घडली नसल्याचेही सांगण्यात आले आहे. शिवाय पूर्व-क्लिनिकल टॉक्सिसिटीच्या अभ्यासात ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक असल्याचे आढळले. तर या लसीने प्राण्यांमध्ये केलेल्या अभ्यासात अँटीबॉडीज तयार केल्या आहेत.

Table of Contents

भारतातील कोविड लसींबद्दल अधिक माहिती –

भारताने जानेवारीमध्ये आपला कोविड लसीकरण कार्यक्रम सुरू केला. आतापर्यंत देशात 25 दशलक्षाहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर कितीतरी डोस इतर देशांमध्ये पाठवण्यात आले आहेत. चाचणीच्या निकालांच्या आधारे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) च्या Covishield (Oxford-AstraZeneca Developed) आणि भारत बायोटेकच्या Covaxin बद्दल तज्ञांनी आपले मत व्यक्त केले. वैद्यकीय जर्नल ‘लॅन्सेट’ ने दोन्ही लसींचा आढावा घेतला आहे. दोन्ही लसी सुरक्षित आहेत आणि त्यांची कार्यक्षमता जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) निर्धारित मानकांपेक्षा जास्त आहे. Covishield आणि Covaxin मध्ये काय फरक आहे आणि कोणते चांगले आहे, आपण समजून घेऊया.

दोन्ही लसी कशा कार्य करतात ?

कोवाक्सिन ही एक निष्क्रिय लस आहे. जी तयार करण्यासाठी मृत कोरोना व्हायरसचा वापर होतो. यासाठी, भारत बायोटेकने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये वेगळ्या केलेल्या कोरोना विषाणूचा नमुना वापरला. जेव्हा ही लस दिली जाते, तेंव्हा रोगप्रतिकारक पेशी मृत विषाणू ओळखतात आणि त्याविरूद्ध प्रतिपिंडे म्हणजेच अँटीबॉडीज तयार करण्यास सुरवात करतात. लसीचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने दिले जातात. ते  2 ° C ते 8 ° C दरम्यान साठवले जाऊ शकतात.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी संयुक्तपणे कोविशील्ड विकसित केले आहे. हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे भारतात तयार केले जात आहे. ही लस सामान्य सर्दी कारणीभूत व्हायरसच्या कमकुवत स्वरूपापासून बनवली गेली आहे. हे कोरोना विषाणूसारखे दिसण्यासाठी सुधारित केले गेले आहे. परंतु यामुळे रोग होत नाही. जेव्हा लस सापडते, तेव्हा ती कोणत्याही कोरोना विषाणूच्या संसर्गाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार करते. 

या दोन लसी किती प्रभावी आहेत ?

 3 मार्च रोजी टप्पा 3 चा चाचणी निकाल जाहीर केला होता, दावा होता की कोवाक्सिनने 81% क्लिनिकल परिणामकारकता दर्शवली. चाचणी दरम्यान ही लस सुरक्षित आहे. शिवाय याव्दारे कोणतेही गंभीर दुष्परिणामही दिसले नाहीत.

ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या आंतरराष्ट्रीय चाचणीमध्ये, ही लस 90% पर्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले. लोकांना आधी अर्धा डोस आणि नंतर पूर्ण डोस दिल्यावर अशी कार्यक्षमता आढळली. एसआयआयच्या मते, लसीमुळे कोणतेही अस्वीकार्य दुष्परिणाम होत नाहीत.

…………………………………..

For Daily Update

 
Join WhatsApp Click hear….
…………………………………………………………………………

More News – 

राज्यातील दोन शिक्षकांना 2021 सालचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

  • 2021 इस्रोची GISAT-1 मोहीम अयशस्वी | 2021 ISRO’s GISAT-1 mission fails -भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपण अयशस्वी ठरले GISAT-1 मिशन आपले लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरले आहे. 12 ऑगस्ट रोजी सकाळी पृथ्वी निरीक्षण उपग्रह –03 लाँच करण्यात आले. या प्रक्षेपणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली कामगीरी झाली. परंतु क्रायोजेनिकच्या वरच्या टप्प्यात तांत्रिक अडथळा आल्यामुळे रॉकेट उपग्रह योग्य कक्षेत ठेवण्यात अपयशी ठरला आहे.    …….For More Information Click hear…

  • जागतिक युवा दिन 2021 | International Youth Day 2021: Date, Significance, History & Theme 

पुढील 30 वर्षात जगाची लोकसंख्या 2 अब्ज लोकांनी वाढण्याची अपेक्षा शक्यता आहे. त्यामुळे असंख्य लोकांनी ओळखले आहे, की फक्त आराग्यदाई आहाराचे अधिक प्रमाणात उत्पादन करणे गरजेचे आहे. तसेच इतर महत्त्वाच्या आव्हानांना देखील संबोधित करणे आवश्यक आहे. जसे की 2030 च्या अजेंडाद्वारे अंतर्निहित जोडणी जसे गरीबी कमी करणे, सामाजिक समावेश, आरोग्य सेवा, जैवविविधता संवर्धन, आणि हवामान बदल या सर्वांचा समावेश आहे.
                           ……For More Information Click hear…
…………………………………………………

KeyWords – #marathinews  #Biotech _1 #RajeNews #भारतबायोटेकLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *