35 वर्षांच्या राष्ट्रसेवेनंतर काल INS सिंधुध्वज ( INS Sindhudwaj ) नौदलातून निकामी करण्यात आले. ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल बिस्वजित दास गुप्ता हे याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते.
संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की सिंधुध्वज पाणबुडी ही नौदलातील सेवा जीवनात रशियन बनावटीच्या सिंधुघोष वर्ग पाणबुड्यांमध्ये स्वदेशीकरण आणि स्वावलंबनाच्या दिशेने भारतीय नौदलाच्या प्रयत्नांची ध्वजवाहक होती.
