Verification: 4e7838d05962b884

या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा ( National Highway ) दर्जा..!

Spread the love

खेड-भीमाशंकर ( khed – Bhimashankar ) या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. हा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

हा महामार्ग 70 KM लांबीचा असून या महामार्गामुळं ( National Highway )राजगुरूनगर ( Khed ), चास, वाडा, तळेघर ही महत्त्वाची शहरे जोडण्या येणार आहेत. शिवाय भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनी सांगितलं आहे. त्यांनी व्टिटरवरुन ही माहिती दिली.

या मार्गामुळे माळशेज घाटातला प्रवासही सुलभ होईल. तसेच परिसरातला शेतमाल मुंबईकडे ( Mumbai ) पोहोच करण्यातील वेळ कमी होईल.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail
Nitin Gadakari