Verification: 4e7838d05962b884

पी.व्ही सिंधूने ( PV Sindhu) सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

Spread the love

बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. सिंधूने ( PV Sindhu) अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या वांग जी यीचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पीव्ही सिंधूचे तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

यापूर्वी सायना नेहवालने ( Saina Nehwal ) 2010 मध्ये आणि साई प्रणीतने 2017 मध्ये विजेतेपद पटकावले होते. सिंधूचे यंदाचे हे तिसरे विजेतेपद आहे. याआधी तिने कोरिया ओपन आणि स्विस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.