Verification: 4e7838d05962b884

America fire broke : भीषण आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न

Spread the love

अमेरिकेतील ( America ) कॅलिफोर्निया राज्यातील जंगलात लागलेली भीषण आग विझवण्यासाठी शेकडो अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यावर्षी सर्वात जास्त जंगल भागात आग लागली आहे. अग्निशमन विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रांतात शुक्रवारी लागलेली आग 21,000 हेक्टरपर्यंत पसरली आहे. अधिका-यांनी सांगितले की, किमान 2,000 स्थानिक रहिवाशांनी या भागातून पलायन केले आहे. या आगीत अनेक घरे जळून खाक झाली आहेत.

कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजम यांनी सांगितले की, शनिवारी सिस्कीओ प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. आग आणखी पसरून अधिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ( A terrible fire broke out in the forest in the state of California in the United States )

NPIC 202281122258
A terrible fire broke out in the forest in the state of California in the United States