Verification: 4e7838d05962b884

MPSC : स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा

Spread the love

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱया स्पर्धा परीक्षांच्या ( Exam ) पद्धतीमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा गटानुसार एकत्र करुन प्रत्येक गटासाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. असे राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC आयोगाने घेतला आहे.

हे बदल पुढच्या वर्षीच्या परीक्षांपासून लागू होणार आहेत. गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती होणाऱ्या सर्व पदांसाठी ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा’ हा नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. अर्ज दाखल करतानाच परिक्षार्थींकडून पदांसाठीचे विकल्प मागवले जातील. त्यानुसार भरती करायच्या पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची संख्या निश्चित केली जाईल आणि प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र निकाल जाहीर केला जाईल. ( MPSC Exam 2023 )

MPSC : Reforms in the pattern of competitive examinations
MPSC : Reforms in the pattern of competitive examinations