Verification: 4e7838d05962b884

AUS vs AFG World Cup 2023 LIVE : मॅक्सवेलच्या द्विशतकाचे झंझावात… अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिरावून घेतला

Spread the love

Australia vs Afghanistan, 39th Match – Cricket Score :

World Cup 2023 मध्ये एक अतिशय रोमांचक सामना आज बघायला मिळाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात हा सामना झाला, ज्यामध्ये कांगारू संघाने 3 विकेट्सने रोमहर्षक विजय खेचून आणला.

या विजयाचा मानकरी ठरला तो स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell). ज्याने दुखापतग्रस्त असतानाही शानदार द्विशतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारू संघाने एकेकाळी 91 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या.

दुखापतीनंतर मॅक्सवेलने द्विशतक झळकावले :

AUS vs AFG World Cup 2023 LIVE Glenn Maxwell
AUS vs AFG World Cup 2023 LIVE Glenn Maxwell

इथून अफगाणिस्तानचा (Afghanistan) विजय अगदी सोपा वाटत होता. पण मॅक्सवेलने तुफानी खेळी केली आणि अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सच्या ( Captain Pat Cummins ) साथीने 8व्या विकेटसाठी 170 चेंडूत 202 धावांची नाबाद भागीदारी केली.