Verification: 4e7838d05962b884

Raj Thackeray ON INDIA Aghadi : आताचे लवंडे कधी कुठे लवंडतील माहिती नाही – राज ठाकरे

Spread the love
Raj Thackeray ON INDIA Aghadi  sanjay raut
Raj Thackeray ON INDIA Aghadi

Raj Thackeray MNS : राज ठाकरे सध्या नाशिक ( Nashik ) दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे जर महाविकास आघाडीसोबत आले तर त्यांना घेणार का ? असा सवाल संजय राऊत यांना विचारला होता. यावर संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले होते प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनाही निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते आले.

पलटवार करत राज ठाकरे म्हणाले, यांच्याकडे कोण जाईल, मुळात आताचे लवंडे कधी कुठे लवंडतील माहिती नाही. यांचा काही भरवसा आहे का ? कोण जाईल यांच्याकडे? इंडीया आघाडीत ( INDIA Aghadi ) नितीश कुमारही ( Nitesh Kumar ) होते, कुठे गेले? असा खोचक सवाल प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.