Verification: 4e7838d05962b884

Video Android 13 : एका फोनमध्ये चालणार तीन नंबर

Spread the love

Android 13: Three numbers running in one phone

फिजिकल सिम कार्ड आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान Android 13 जी Google च्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमची पुढील आवृत्ती असणार आहे. याच अनेक नवीन फीचर देण्याची कंपनी तयारी करत आहे. ज्यामध्ये सिम कार्ड न बदलता एका फोनवर अनेक फोन नंबर वापरता येतील.

सिमकार्ड मिनीवरून मायक्रो आणि ई-सिमवर आले. सध्या ई-सिमची समस्या ड्युअल सिम ही आहे, परंतु Google Android 13 सह ही समस्या सोडवणार आहे. अँड्रॉइड पोलिसच्या रिपोर्टनुसार, अँड्रॉइड 13 च्या लेटेस्ट कोडमध्ये मल्टीपल इनेबल्ड प्रोफाइल (MEP) नावाचे एक नवीन फीचरवर काम करत आहे. Android 13 मध्ये लागू करण्याची योजना आखत आहे. Android मधील MEP एकाच eSIM वर एकाधिक सिम प्रोफाइल देण्याची सिस्टीम असू शकते. ज्यामुळे एकाच वेळी दोन नेटवर्क वापरण्यासाठी दोन वेगळे सिम कार्ड किंवा दोन eSIM कार्ड वापरण्याची आवश्यकता राहणार नाही.

Android 13

फोन केवळ eSIM ला सपोर्ट देत नसेल, तसेच फिजिकल सिम कार्ड स्लॉट असलेल्या फोनवर हे फीचर लागू केले असल्यास, वापरकर्त्याला फोनवर तीन मोबाइल नेटवर्क वापरता येतील. सध्याच्या फोनमध्ये एकाच वेळी तीन नेटवर्कला सपोर्ट करण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी सिम कार्ड स्लॉट eSIM ने रिप्लेस केले जाऊ शकतात. दोन नेटवर्कसाठी eSIM वापरल्याने वापरकर्त्यांना दोन मोबाइल नंबर वापरण्याची गरज नसते.

जर Google ने Android 13 सह हे फीचर जारी केले, तर तुम्ही एकाच फोनमध्ये एकाच वेळी तीन सिम कार्ड वापरता येतील. ज्यामध्ये एक फिजिकल सिम असेल आणि इतर दोन ई-सिम असतील.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!