Verification: 4e7838d05962b884

शेतकऱ्यांच्या एफपीओ FPO निर्मितीला मिळणार प्रोत्साहन

Spread the love

Encouragement of farmers for FPO creation

farmers fpo 1
Farmers fpo

FPO म्हणजे काय ?

शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी) हा शेतकऱ्यांचा एक गट असेल. तो कृषी उत्पादनाच्या कामात गुंतलेला असेल आणि शेतीशी संबंधित व्यावसायिक उपक्रम राबवेल. एक गट तयार करून कंपनी कायद्यांतर्गत त्याची नोंदणी करता येते. या शेतकऱ्यांच्या गटामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उत्पादनांना बाजारपेठ तर मिळेलच; शिवाय खते, बियाणे, कीटकनाशके आणि कृषी उपकरणे आदी खरेदी करणे सोपे जाईल. सेवा स्वस्त होतील आणि मध्यस्थांच्या जाळ्यापासून शेतकऱ्यांना सुटका मिळेल.

शेतकरी उत्पादक संघटनांच्या (एफपीओ) (Encouragement of farmers for FPO creation)निर्मितीला प्रोत्साहन देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ही मोहिम खासदाराकडून राबविली जाणार आहे. या पाच वर्षांत पाच हजार कोटी रुपये या योजनेस खर्च करण्याचे नियोजन आहे. या संस्थेची नोंदणी कंपनी कायद्यांतर्गतच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शेतकयांना एक कंपनी म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करावी लागेल. सरकारने १० हजार नवीन शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. उद्योगांना जे फायदे मिळतात ते सर्व एफपीओमध्ये समाविष्ट असणाऱ्या शेतकन्यांना मिळतील.

एफपीओ प्रणालीमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळतो, कारण विक्रीच्या प्रक्रियेत मध्यस्थ नसतो. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या मते, २०१९-२० ते २०२३ २४ या कालावधीत असे १० हजार नवीन एफपीओ तयार केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती वाढेल.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!