Verification: 4e7838d05962b884

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking

Spread the love

पोस्टाचे (Post)नवे नियम लागू होणार…

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
Indian post banking

१८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेत (आयपीपीबी) डिजिटल खाते उघडता येईल; पण केवायसी अद्ययावत केले नाही तर वर्षभरानंतर डिजिटल बचत खाते बंद होईल. तसे घडल्यास जीएसटीसह १५० रुपये दंड खातेदाराला भरावा लागेल. हा नवा नियम ५ मार्च २०२२ पासून लागू होईल.

ज्याच्याकडे आधार आणि पॅनकार्ड आहे, अशा १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणालाही डिजिटल बचत खाते उघडता येईल. खात्यात मासिक सरासरी शिल्लक ठेवण्याची गरज नाही आणि झीरो बॅलन्सवरही खाते उघडता येईल.

इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेकडून १ फेब्रुवारी २०२२ पासून बचत खात्यावरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. बचत खात्यातील एक लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर सध्याचा व्याजदर वर्षाला २.५० टक्के आहे, तो आता २.२५ टक्के असेल. खातेदाराला १२ महिन्यांच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार. केवायसीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात अपडेट होईल. या खात्यात जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करता येतील. १२ महिन्यांत केवायसी पूर्ण केल्यानंतर डिजिटल बचत खाते पोस्ट ऑफिस बचत खात्याला जोडता येईल.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!