Verification: 4e7838d05962b884

Export Readiness Index – 2021 | निर्यात सज्जता निर्देशांक- २०२१

Spread the love

Maharashtra ranks second in exports Readiness Index | निर्यातीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

Export Readiness Index - 2021 | निर्यात सज्जता निर्देशांक- २०२१
Export Readiness Index – 2021

निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक- २०२१’ अहवालात ७७.१४ गुणांसह देशात दूसरे स्थान मिळविले. नीती आयोगाने आज ‘निर्यात सज्जता निर्देशांक- २०२१’ जाहीर केला. आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांच्या उपस्थितीत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

या अहवालात एकूण ४ प्रमुख मानके आणि ११ उपमानकांच्या आधारावर देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्यात क्षेत्रातील प्रगती मांडली आहे. चार पैकी तीन प्रमुख मानकांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि निर्यात प्रोत्साहन धोरण या उपमानकांत राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. धोरणात्मक मानकांमध्ये ८२.४७ गुण, व्यापार परिसंस्था (इकोसिस्टीम) ८६.४२ आणि निर्यात परिसंस्था मानकांत ८१.२७ गुण मिळवत महाराष्ट्र या तिन्ही प्रमुख मानकांत देशात दुसऱ्या स्थानावर राहिले आहे. यासोबतच निर्यात कामगिरी या प्रमुख मानकांमध्ये ४९.३७ गुणांसह राज्य देशात तिसऱ्या स्थानावर राहिले आहे.

पायाभूत सुविधा’ आणि ‘निर्यात प्रोत्साहन धोरण’ या दोन उपमानकांत १०० गुण मिळवत राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. ‘आर्थिक सुलभता’ आणि ‘वाहतूक उपलब्धते’तही महाराष्ट्राने देशातील अग्रगण्य राज्यांमध्ये स्थान मिळविले. चार प्रमुख व ११ उपमानकांच्या आधारे महाराष्ट्राला ७७.१४ गुणांसह या निर्देशांकात दसरा क्रमांक मिळाला आहे. ७८.८६ गुणांसह गुजरात पहिल्या स्थानावर आहे. यापूर्वी ‘निर्यात सज्जता निर्देशांक- २०२०’ (प्रथम आवृत्ती) मध्येही महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकाविला होता.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!