Verification: 4e7838d05962b884

आता फिक्स्ड पेन्शन (fixed pension)स्कीम ?

Spread the love

फिक्स्ड पेन्शनच्या उद्देशाने नवीन पेन्शन योजना

आता फिक्स्ड पेन्शन (fixed pension)स्कीम ?
pension

पेन्शन स्कीमअंतर्गत किमान पेन्शन वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, अद्याप तरी त्यासंदर्भात कोणताही निर्णय होऊ शकेलला नाही. त्यातच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) फिक्स्ड पेन्शनच्या उद्देशाने नवीन पेन्शन योजना आणण्याच्या बेतात आहे.

काय असेल नव्या योजनेत ?

नव्या फिक्स्ड पेन्शन योजनेत पेन्शन किती असावी, याची निवड करण्याचा पर्याय असेल. त्याचबरोबर या योजनेत स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती आणि खासगी यांनाही नोंदणी क्षेत्रातील कर्मचारी करता येऊ शकेल. तसेच पेन्शनची रक्कम वेतन आणि उरलेला सेवाकाळ यांच्या आधारावर ठरवली जाईल. जास्त पेन्शनसाठीचा पर्याय उपलब्ध असेल. परंतु फिक्स्ड पेन्शनची रक्कम योगदानाच्या रकमेवरून निश्चित केली जाईल. तुम्हाला जेवढी पेन्शन हवी असेल त्यानुसार योगदान द्यावे लागेल.
सद्य:स्थितीत ईपीएसमधील रक्कम पूर्णत: करमुक्त आहे. परंतु त्यात किमान पेन्शन खूप कमी आहे. त्यातील मर्यादा दरमहा १२५० रुपये एवढीच आहे. त्यामुळे फिक्स्ड पेन्शन योजनेत जास्त पेन्शन रक्कम देण्याला प्राधान्य आहे.

whatsapp community 2 1
!!..Click hear to join..!!