Verification: 4e7838d05962b884

अॅमेझॉन(Amazon), फ्लिपकार्टला (Flipkart) ‘ओपन नेटवर्क’चा पर्याय..!

Spread the love

Open Network vs Amazon & Flipkart

भारतातील किरकोळ बाजारात अॅमेझॉन Amazon आणि फ्लिपकार्टसारख्या Flipkart कंपन्यांची चलती आहे. त्याला आता शह मिळणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील नवे ऑनलाईन मार्केट Online Market म्हणजेच ‘ओपन नेटवर्क’ Open Network तथा ओएनडीसी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी यूपीआय UPI आणि आधारसारख्या उपक्रमांचे आधारस्तंभ राहिलेले इन्फोसिसचे INFOCIS एक संस्थापक नंदन निलकेणी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

Amazon,  Flipkart,  Online Market
Amazon, Flipkart, Online Market

ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स Open Marcket for Digital Commerce (ओएनडीसी) ONDC असे या प्रकल्पाचे नाव आहे. या ओपन नेटवर्कमध्ये किरकोळ किराणा दुकानदारापासून ते भाजी मंडईतल्या भाजी विक्रेत्यापर्यंत आणि मोठ्या मार्केटमधील व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना आपले उत्पादन विकता येणार आहे. त्याचबरोबर सर्व ग्राहकांना हे मार्केट खुले असणार आहे. साबणापासून ते बिझनेस क्लास विमानाच्या Business Class तिकिटापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

सध्या ओपन नेटवर्क दिल्लीसह पाच शहरांत आणि नंतर शंभर शहरांत सुरू होईल. नंतरच्या शंभर शहरांमध्ये महाराष्ट्रातील महानगरांचा क्रम लागू शकतो. सुरुवातीला दीडशे व्यापारी या नेटवर्कमध्ये सहभागी होतील. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) DPIIT कडे या प्रकल्पाची सूत्रे असली तरी हा प्रकल्प ना नफा तत्त्वावर खासगी पातळीवरच राबवला जाणार असल्याचे डीपीआयआयटीचे अतिरिक्त सचिव अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking