Verification: 4e7838d05962b884

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा (Jawaharlal Darda) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकार आणणार शंभर रुपयांचे स्मरणीय नाणे (coin of Rs 100)

Spread the love

Government will bring a commemorative coin of Rs 100 on the birth centenary of freedom fighter Jawaharlal Darda

लोकमत वृत्तपत्र Daily Lokmat समूहाचे संस्थापक आणि प्रसिद्ध स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा Jawaharlal Darda उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकार शंभर रुपयांचे एक स्मरणीय नाणे जारी करणार आहे. २६ एप्रिल २०२२ रोजी वित्त मंत्रालयाच्या आर्थिक कार्य विभागाने हे नाणे जारी करण्यासंबंधी राजपत्रित अधिसूचनाही जारी केली आहे. भारत सरकारच्या मुंबई टांकसाळीत हे नाणे तयार केले जाणार आहे.

download 3
Jawaharlal Darda

जवाहरलाल दर्डा Jawaharlal Darda यांच्या स्मरणार्थ जारी केल्या जाणाऱ्या शंभर रुपयांच्या नाण्याचे वजन एकूण ३५ ग्रॅम असेल आणि त्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्ताचे मिश्रण असेल. या नाण्याची गोलाई ४४ मिलिमीटर असेल. छायाचित्राच्या उजव्या आणि डाव्या बाजूला १९२३ आणि २०२३ असे लिहिलेले असेल. नाण्याच्या अग्रभागी अशोक स्तंभाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला भारत आणि इंडिया लिहिलेले असेल, अशोक स्तंभाखाली अंकित मूल्य रुपये शंभर लिहिलेले असेल.

२ जुलै २०२३ रोजी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मदिनी या नाण्याचे समारोहपूर्वक अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. बाजारात चलनात न येणारे हे एक स्मरणीय नाणे असेल. या नाण्याचे अनावरण केल्यानंतर भारत सरकारच्या टांकसाळीमार्फत एक संग्रही वस्तूंप्रमाणे विक्री केली जाईल. देश-विदेशांतील बाबूजींचे चाहते आणि नाणे संग्राहक हे नाणे एक वारसा म्हणून जतन करून ठेवतील.

जवाहरलालजी दर्डा यांनी १९५२ मध्ये मराठी साप्ताहिक ‘लोकमत’ Lokmat सुरू केले. लोकमत १९७१ मध्ये नागपूरमधून दैनिक म्हणून प्रकाशित होऊ लागले. आज ‘लोकमत’ महाराष्ट्र आणि गोव्याचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी दैनिक आहे. ‘लोकमत’ ची नागपूर आवृत्ती यावर्षी सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. २५ नोव्हेंबर १९९७ रोजी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन झाले. ‘बाबूजी’ या नावाने लोकप्रिय महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्वातंत्र्य संग्राम सेनानी, प्रखर गांधीवादी, राजकीय नेते, समाजसेवक, परोपकारी तसेच कुशल प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ स्व. जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म २ जुलै १९२३ रोजी यवतमाळच्या एका समृद्ध परिवारात झाला होता.

किशोरावस्थेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला. जवाहरलालजी १९७२ ते १९९५ पर्यंत चारवेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले. त्यांनी वसंतदादा पाटील, ए. आर. अंतुले, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, शरद पवार, सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये ऊर्जा, उद्योग, सिंचन, नागरी विकास, अन्न व पुरवठा, वस्त्रोद्योग, पर्यावरण, युवक कल्याण आणि क्रीडा यासारख्या महत्त्वपूर्ण मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्षही होते. जवाहरलालजी दर्डा यांना महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचे सूत्रधार आणि वैद्यकीय सुविधांतील व्यापक सुधारणांसाठी ओळखले जाते.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking