Verification: 4e7838d05962b884

Hindu will also get minority status | हिंदूंनाही अल्पसंख्याक दर्जा मिळणार

Spread the love
Hindu will also get minority status | हिंदूंनाही अल्पसंख्याक दर्जा मिळणार
हिंदूंनाही अल्पसंख्याक दर्जा मिळणार

केंद्र सरकारनं Modi Government सर्वोच्च न्यायालयाला Supreme Court ला माहिती दिली की, राज्य सरकार राज्यांच्या सीमेवरील हिंदूंसह Hindu धार्मिक आणि भाषिक समुदायांना ‘अल्पसंख्याक’ म्हणून मान्यता देऊ शकतात. यासंबंधीची याचीका अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केली होती. सरकारनं हिंदूबाबत (Hindu) ही भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडलीय आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था कायदा, 2004 च्या कलम 2 (एफ) च्या वैधतेला उपाध्याय यांनी यांनी आव्हान दिले.

दरम्यान, याचिकाकर्त्यानं देशातील विविध राज्यांमध्ये अल्पसंख्याकांच्या ओळखीसाठी मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्याचे निर्देशही मागवले आहेत. देशातील किमान 10 राज्यांमध्ये हिंदूही अल्पसंख्याक आहेत; पण त्यांना अल्पसंख्याक योजनांचा लाभ मिळत नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्याचबरोबर मिझोराम, नागालँड, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पंजाब, लक्षद्वीप, लडाख, काश्मीर येथील हिंदूंना देखीन अल्पसंख्याक दर्जा मिळावा. अशी मागणीही करण्यात आली आहे.

हिंदू अल्पसंख्याक असलेल्या राज्यांतील हिंदूंना संबंधित राज्य सरकारांद्वारे अनुच्छेद 29 आणि 30 मधील तरतुदींन्वये अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केलं जाऊ शकते असंही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयापुढं स्पष्ट केले आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!