Verification: 4e7838d05962b884

Indian Constitution भारतीय राज्यघटना ब्रेल लिपीत ..!

Spread the love

Indian Constitution in Braille ..!

Indian Constitution भारतीय राज्यघटना ब्रेल लिपीत ..!
Indian Constitution

अंध बांधव राज्यघटनेच्या वाचनापासून अलिप्त होते. आता त्याना राज्यघटना समजून घेता येणार आहे. भारतीय राज्यघटना Indian Constitution ब्रेल लिपीत आणण्याचे मोठे काम अस्तित्व फाउंडेशनच्या प्रियांका राहुल झाल्टे यांनी केले आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारापासून ते कर्तव्याप्रती जागरूकता वाढत असताना अंधांना राज्यघटनेचे महत्त्व ऐकूनच ठाऊक आहे. ते ब्रेल लिपीत आणण्यासाठी प्रियांका झाल्टे यांनी अस्तित्व संस्थेतील १५ अंध मुलांची आणि प्रेलर टाईपरायटरची मदत घेतली.

राज्यघटनेचे ब्रेल लिपीत सात खंड तयार झाले आहेत. राज्य सरकारने पहिल्या खंडाचे प्रकाशन केले आहे. यात राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्य या प्रकरणांची माहिती ब्रेल लिपीत आहे. यामध्ये इंडेक्‍स तसेच अनुच्छेदांची यादी असणार आहे. ब्रेल लिपीतील सात खंडाच्या एकूण पानांची संख्या ८०० वर गेली आहे.

आंबेडकरी विचारवंत डॉ. भगवंतराव गायकवाड यांचे दस स्पोक आंबेडकर The Spoke Ambedkar हे पुस्तकही ब्रेल लिपीत केले आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!