Verification: 4e7838d05962b884

भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारावर ९ वर्षांनंतर पुन्हा चर्चा | Indo-EU free trade agreement renegotiated after 9 years

Spread the love

भारत-युरोपीय ( Indo-EU ) महासंघादरम्यान मुक्त व्यापार करार करण्यात येणार आहे. ९ वर्षांनंतर पुन्हा चर्चा सुरू होणार आहे. वाणिज्यमंत्री पियुष गोयल ( Piyush Goyal ) आणि युरोपीय महासंघाचे उपाध्यक्ष वालदीस डोंब्रोवस्कीस ( Valdis Dombrovsky ) यांनी संयुक्तरित्या युरोपीय महासंघाची राजधानी ब्रुसेल्स इथं आज ही घोषणा केली.

दरम्यान, गुंतवणूक सुरक्षा करार आणि भौगोलिक संकेत कराराचाही त्यात समावेश आहे. भारतासाठी युरोपीय महासंघ हा त्याचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत-युरोपीय महासंघादरम्यान २०२१-२२ मध्ये ४३ पूर्णांक ५ टक्के वार्षिक वाढीसह ११६ पूर्णांक ३६ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा व्यापार झाला आहे.

युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन ( Ursula von der Leyen ) यांची दिल्ली भेट आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्यात या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या युरोप भेटीमुळे या कराराच्या चर्चेला वेग आला आणि वाटाघाटींसाठी स्पष्ट दिशानिर्देश निश्चित करण्यात आले. या तिन्ही करारांसाठी वाटाघाटीची पहिली फेरी २७ जून ते १ जुलै दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे.

NPIC 2022618211958 1
Indo-EU free trade agreement