Verification: 4e7838d05962b884

World Literacy Day 2021 | जागतिक साक्षरता दिवस 2021

Spread the love

8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिवस जगभरात साजरा | September 8 World Literacy Day celebrated around the world

International Literacy Day 2021
International Literacy Day 2021

जागतिक साक्षरता दिवस 2021 आज, दि. 8 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जात आजहे. हा दिवस साक्षरतेचे महत्त्व आणि साक्षरता हा एक अधिकार आहे, याची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्कोने 8 सप्टेंबर 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून घोषित केला.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2021 ची थीम | International Literacy Day 2021: Theme

जागतिक साक्षरता दिनाची यावर्षीची थीम “मानव-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल विभाजन संकुचित करणे” ही आहे. डिजिटल साक्षरतेबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी ILD 2021 ची थीम तयार करण्यात आली आहे. कोविड – 19 महामारीमुळे मुले, तरुण आणि प्रौढांच्या शिकण्यात अडथळा निर्माण होत, असल्याने नागरिकांमध्ये ज्ञानाचे विभाजन वाढले आहे.

जागतिक साक्षरता दिवस 2021 चे महत्त्व | Significance of World Literacy Day 2021

युनेस्कोच्या मते, जगभरातील 773 दशलक्ष तरुण प्रौढांमध्ये आज साक्षरतेची कौशल्ये नाहीत. ILD 2021 हा एक उपक्रम आहे, ज्याव्दारे तरुणांना साक्षर होण्यासाठी आणि साक्षरतेचे विभाजन रोखण्यासाठी जागरूकता पसरवते. तसेच, साक्षरता हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांचा म्हणेजेच SDGs आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या 2030 च्या शाश्वत विकासाचा अजेंडा आहे.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2021 ; युनेस्को | International Literacy Day 2021; UNESCO

जागतिक साक्षरता दिवस 2021 साजरा करण्यासाठी युनेस्को एक थेट वेबिनार आयोजित करणार आहे. युनेस्कोच्या मते, “साक्षरता आणि परस्पर संबंधांवर विशेष लक्ष केंद्रित करून, मानवी केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी भक्कम पाया तयार करण्यासाठी साक्षरता कशी योगदान देऊ शकते याचा शोध ILD 2021 करेल. अशिक्षित तरुण आणि प्रौढांसाठी डिजिटल कौशल्ये आवश्यक आहेत. हे तंत्रज्ञानाद्वारे व्यक्तीला सक्षम साक्षरता शिक्षण सर्वसमावेशक आणि अर्थपूर्ण बनवते.” असं UNESCO ने म्हंटले आहे.

More News –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *