Verification: 4e7838d05962b884

Shri lanka : राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे ( Gotabaya Rajapakse ) यांचा राजीनामा

Spread the love

श्रीलंकेचे ( Shri lanka ) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे ( Gotabaya Rajapakse ) यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी संसदेच्या अध्यक्षांना ई-मेल पाठवला आहे. श्रीलंकेच्या संसदेच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची पुष्टी केली आहे. राजपक्षे आज सौदी एअरलाइन्सच्या विमानाने मालदीवहून सिंगापूरला पोहोचले.

सिंगापूर सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना आज चांगी विमानतळावर उतरण्याची परवानगी देण्यात आली. गोटाबाया राजपक्षे हे वैयक्तिक भेटीवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

श्रीलंकेत या महिन्याच्या 9 तारखेला राजधानी कोलंबो येथील राष्ट्रपतींचे निवासस्थान ( Residence of the President )आंदोलकांनी ताब्यात घेतल्यानंतर राजपक्षे आणि त्यांची पत्नी मालदीवला रवाना झाले होते. कोलंबो सोडण्यापूर्वी त्यांनी राजीनामा पत्र पाठवणार असल्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघ यांनी श्रीलंकेचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवल्याचे लक्षात घेऊन त्यांनी लष्कराला देशात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

Gotabaya Rajapakse
Gotabaya Rajapakse