Verification: 4e7838d05962b884

मंकी पॉक्स ( monkey pox ) या आजाराचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

Spread the love

मंकी पॉक्स या आजाराचा सामना करण्यासाठी सर्वांनी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असे केंद्र सरकारनं सांगितले आहे. मंकी पॉक्स या आजाराचा प्रसार जगभरात होत आहे. त्यामुळे भारतामध्ये देखील सार्वजनिक आरोग्य प्रणाली मजबूत करणं आवश्यक आहे.

monkey pox
monkey pox

दरम्यान, या आजाराशी लढा देण्याची पूर्वतयारी करायला हवी, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण ( Rajesh Bhushan ) यांनी या पत्रात म्हटलं आहे.

मंकी पॉक्स ( monkey pox ) या आजाराचं निदान, चाचणी आणि व्यवस्थापनासाठी रुग्णालयं, डॉक्टर आणि रोग निदान केंद्रांसहित सर्व संबंधित विभागांनी विविध स्तरावर काम करावं, तसंच रोग तपासणी पथकांनी सर्व प्रवेश मार्गांवर संशयित रुग्णांची ओळख आणि तपासणी करावी, असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत.