Verification: 4e7838d05962b884

Use and Throw प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी

Spread the love

( Use and Throw ) एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तूंचे बेकायदा उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी देशभरात १ जुलै २०२२ पासून करण्यात येणार आहे. असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

एकदाच वापरण्यात येणारं प्लॅस्टिक हद्दपार करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला अनुसरून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं १२ ऑगस्ट २०२१ रोजी ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम, २०२१’ अधिसूचित केले आहेत.

download 1
Use and Throw प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी

बंदी घालण्यात आलेल्या वस्तू –

प्लास्टिकच्या काड्या असलेले ईअर-बड्स
फुग्यांना लावलेल्या प्लास्टिकच्या काड्या
प्लास्टिकचे झेंडे
गोळ्या
चॉकलेटला लावलेल्या प्लास्टिकच्या काड्या
आईस्क्रीमला लावलेल्या प्लास्टिकच्या काड्या
सजावटीसाठी वापरला जाणारा थर्मोकॉल
प्लास्टिकच्या ताटल्या
कप, पेले, काटे-चमचे, सुऱ्या, स्ट्रॉ, ढवळण्याच्या काड्या, ट्रे,
मिठाईच्या खोक्यांवरील वेष्टने,
आमंत्रण पत्रिका,
सिगारेटची पाकिटे आणि मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे फलक यांचा समावेश आहे.