Verification: 4e7838d05962b884

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले | Krantijyoti Savitribai

Spread the love

वीरांगणा सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले | Krantijyoti Savitribai
सावित्रीबाई फुले

भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका आणि वीरांगणा सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती दिनांक 3 जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. विज्ञान-तंत्राज्ञान, कृषी, शिक्षण, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिायांनी यश मिळविले आहे. या स्त्रिकर्तृत्वाचा पाया स्त्री शिक्षणातून ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी रचला. सावित्रीबाई फुले म्हणजे अष्टपैलु व्यक्तित्व, प्रचंड व्यासंग त्यामुळे महात्मा जोतिबा यांच्या सोबत सावित्रीबाईंचे प्रत्येक पाऊल शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे ठरले आहे. समाजातून होत असलेला विरोध डावलून त्यांनी आपला वसा कायम ठेवला.

शिक्षण, संशोधन ,अध्यापन, विज्ञान, तंत्रज्ञान, सुरक्षा, साहित्य, सांस्कृतिक, समाजकारण ते राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात चौफेर कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांच्या कारकीर्दीचे हे शतक साक्षीदार आहे. त्याचसोबत या सगळ्या क्षेत्रातील महिलांचा वावर आज जितका सुलभ, विनासायास बनलेला आहे, त्याच्या कितीतरी अधिक कठिण होते सावित्रीबाईंच्या काळात तत्कालीन समाजाच्या प्रखर विरोधाची खडतर वाट तुडवत मुली,महिला,वंचित, शोषित घटकांना शिक्षण,प्रगतीच्या संधी मिळवून देणे. हे केवळ अवघड नव्हे तर जवळपास अशक्य होते.

Capture

देशातील प्रथम महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणुन सावित्रीबाई यांच्याकडे आदरोन पाहिले जाते. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ही जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पेलली. उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्यांनी अध्यापना बरोबरच विर्द्यार्थींनीच्या व्यक्तिमत्व विकासालाही चालना दिली. शिक्षणाबरोबरच विधवा स्त्रियांच्या फसवणूकीतून जन्माला येणाऱ्या निष्पाप बाळांच्या जीवीत संरक्षणाच्या उद्देशाने बालहत्या प्रतिबंधक गृह(1853), विधवांसाठी गृह स्थापनेच्या (1863) या महात्मा फुलेंच्या कार्यात सावित्रीबाई सक्रीयपणे सहभागी होत्या. विधवा स्त्रियांची 35 बाळंतपणे केली.

या दोघांनी एका बालविधवेचे बाळ दत्तक घेतले. त्याला स्वतःचे नाव व वारसा देत आपला उत्तराधिकारी बनवले. त्यांचा हा पुत्र म्हणजे डॉ.यशवंत. अनाथ बालकाश्रम चालविणे, 1868 मध्ये घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करणे, त्याचबरोबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापनाही जोतिबांनी केली. जोतिबांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी हे कार्य सुरुच ठेवले.