Verification: 4e7838d05962b884

21 May : राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन | National Anti-Terrorism Day

Spread the love

भारत दरवर्षी २१ मे रोजी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन साजरा करतो. हा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो.

National Anti-Terrorism Day
National Anti-Terrorism Day

राजीव गांधी (Rajiv Gandhi) हे भारताचे सहावे पंतप्रधान होते. 1984 ते 1989 दरम्यान त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. मे 1991 मध्ये तामिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदूरमध्ये त्यांची हत्या झाली. दहशतवाद आणि त्याचा मानवी समाजावर होणार्‍या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी National Anti-Terrorism दिन साजरा केला जातो. हा दिवस शांतता आणि मानवतेचा संदेशही देतो.

राजीव गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. राजीव गांधी यांची हत्या श्रीपेरंबदुर येथे लोकसभा उमेदवाराचा प्रचार करत असताना करण्यात आली. बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला. सुप्रीम कोर्टाने पुष्टी केली की श्री. गांधी यांची हत्या LTTE संघटनेने केली होती. एलटीटीईच्या कारवाया रोखण्यासाठी भारत श्रीलंकेत भारतीय शांती सेना पाठवणार होता.