Verification: 4e7838d05962b884

BJP शक्तीप्रदर्शन 19 राज्यांचे मुख्यमंत्री करणार मोर्चेबांधणी

Spread the love

हैदराबादमध्ये आजपासून (BJP) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरू होणार आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

याठिकाणी झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोस्टर्समध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत मोदींची स्तुती करण्यात आली आहे. 2 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तर 3 जुलै रोजी परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासह जाहीर सभेचं आयोजन केले आहे.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 4
BJP शक्तीप्रदर्शन