Verification: 4e7838d05962b884

BMW project move from Maharashtra to Tamil Nadu | BMW चा प्रकल्प महाराष्ट्रातून – तामिळनाडूला का गेला ?

Spread the love
bmw 1
BMW project move from Maharashtra to Tamil Nadu

BMW Project Maharastra : BMW या वाहन क्षेत्रातील आघाडलच्या कंपनीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येण्यासाठी तयार होता. तत्काली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे त्यावेळी सरकार होते. तेंव्हा प्रकल्प महाराष्ट्रातून तामिळनाडू येथे गेला असं राज ठाकरे यांनी सांगितले. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून ( Maharastra ) गेला. याविषयी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

BMW कंपनीचे अधिकारी भेटीसाठी आले असता, त्यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ( Vilasrao Deshmukh ) कामानिमित्त बाहेर गेले होते. ही मिटींग देशमुख यांच्या अधिकाऱ्यांनी अटेंड केली. परंतू समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने कंपनीचे अधिकारी निघून गेले. त्यांना पायाभूत सुविधा देण्यास नकार देण्यात आला. दरम्यान, दाक्षिणात्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना ही माहिती दिली. तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांनी BMW कंपनीशी संपर्क साधला. अशा प्रकारे कंपनी तामिळनाडू ( Tamilnadu ) येथे सुरू झाली अशी माहिती राज यांनी दिली. ( Why did the BMW project move from Maharashtra to Tamil Nadu? )

BMW project move from Maharashtra to Tamil Nadu

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ