Verification: 4e7838d05962b884

मुख्यमंत्र्यांसारखी ( CM Eknath Shinde ) वेशभूषा करणे पडले महागात

Spread the love
cm
CM Eknath Shinde – Vijay Mane

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ ( Sharad Mohol ) त्याच्यासोबत फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विजय नंदकुमार माने ( Vijay Mane ) असे वेशभूशा केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादिनूसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीविरोधी पथक सोमवारी सकाळी बंडगार्डन परिसरात गस्त घालत असताना त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आढळून आले.

व्हॉटस्अप व फेसबुक या सोशल मीडियावर अधिक माहिती घेतल्यावर पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो नीट पाहिल्यावर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसून विजय माने याचा असल्याचे समोर आले. ( CM Eknath shinde Duplicate Vijay Mane )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

CM Eknath Shinde – Vijay Mane

BMW project move from Maharashtra to Tamil Nadu | BMW चा प्रकल्प महाराष्ट्रातून – तामिळनाडूला का गेला ?
Maharashtra 10th & 12th Exam 2023 – इयता 10th आणि 12th परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर
India Vs Australia T20 – मोहाली येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-ट्वेंटी क्रिकेट सामना
World Youth Chess Championship Romania : प्रणव आनंदने ए.आर. इलमपर्थीने विजेतेपद पटकावले
%d bloggers like this: