Verification: 4e7838d05962b884

Comedian Raju Srivasrtav : सर्वांना हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तवने रडविले

Spread the love

Comedian Raju Srivasrtav : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना AIIMS दाखल करण्यात आले होते. राजू श्रीवास्तव ( Raju Srivasrtav ) यांच्या पार्थिवावर उद्या दिल्लीत ( Delhi ) अंत्यसंस्कार होणार आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी ( PM Modi ), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि देशातील इतर राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला.

राजू श्रीवास्तव यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी दिल्ली एम्समध्ये पोहोचले आहेत. राजू श्रीवास्तव यांच्यावर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर ( Kanpur ) येथे झाला. बालपणी त्यांचे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव ( Prakash Srivastav ) होते. राजूला लहानपणापासूनच मिमिक्री आणि कॉमेडीची खूप आवड होती. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ ( The great laughter challenge ) या कॉमेडी शोमधून राजूला ओळख मिळाली. या शोच्या यशानंतर राजूने मागे वळून पाहिलेच नाही. राजू श्रीवास्तव यांनी 1993 मध्ये शिखा श्रीवास्तवशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.

राजू श्रीवास्तव यांनीही राजकारणात हात आजमावला. त्यांना 2014 मध्ये कानपूरमधून लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha election ) सपाकडून तिकीट मिळाले होते. मात्र नंतर त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये ( BJP ) प्रवेश केला. पीएम मोदींनी त्यांना स्वच्छ भारत अभियानात ( Swach bhaat Abhiyan ) नामांकित केले. यानंतर त्यांनी स्वच्छतेबाबत विविध शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमांमध्येही सहभाग घेतला. राजू श्रीवास्तव यांना 2019 मध्ये यूपी फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष बनवण्यात आले.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ