Verification: 4e7838d05962b884

CTET डिसेंबर-2022 मध्ये घेण्यात येईल

Spread the love

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा-सीटीईटी ( CTET ) या वर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. मात्र, नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल. असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे. सीटीईटीच्या 16 व्या आवृत्तीची ही परीक्षा सीबीटी ( CBT ) म्हणजेच संगणकावर आधारित असेल. ही परीक्षा देशभरातील 20 भाषांमध्ये घेतली जाईल.

सर्वसाधारण विद्यार्थी आणि ओबीसी ( OBC ) प्रवर्गातील उमेदवारांसाठी एका पेपरसाठी अर्ज शुल्क 1,000 रुपये असेल, तर एससी ( SC) , एसटी ( ST ) आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये असेल. दोन पेपरसाठी, सामान्य आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 1200 रुपये शुल्क असेल, तर त्यासाठी अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना 1200 रुपये भरावे लागतील.

परीक्षा, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता, परीक्षा शुल्क आणि परीक्षेची ठिकाणे आणि महत्त्वाच्या तारखा यासंबंधीची माहिती CTET https://ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मंडळाने दिली आहे.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 12
https://ctet.nic.in