Verification: 4e7838d05962b884

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी

Spread the love

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ( Vasantrao Naik Marathwada Agricultural University ) कुलगुरूपदी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संशोधन सहसंचालक, डॉक्टर इंद्र मणी ( Dr. Indra Mani ) यांची नियुक्ती झाली आहे. विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण ( Dr. Ashok Dhavan ) यांचा कार्यकाळ गेल्या सहा मे रोजी संपल्यामुळे विद्यापीठाचं कुलगुरुपद रिक्त झालं होतं. डॉ. इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेतून कृषी अभियांत्रिकी या विषयात एम.एससी. आणि पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासकीय कार्य आणि कृषी विस्तार सेवेचा व्यापक अनुभव आहे. ( Vasantrao Naik Marathwada Agricultural University )

NPIC 20227159574
Vasantrao Naik Marathwada Agricultural University