Verification: 4e7838d05962b884

महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची ( Heave Rain ) शक्यता

Spread the love

राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस ( Heave Rain ) पडत आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात येथे तुरळकर प्रमाणात अतिवृष्टी झाली. हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे पाच दिवस कोकण किनारपट्टी ( Konkan ) तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक जयंत सरकार यांनी सांगितली आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. माथेरानपेक्षा मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी अधिक पावसाची नोंद झाली आहे. शिवाय अनेक भागांत दुसऱ्या दिवशी 140 ते 150 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत मुंबई आणि ठाण्यात 200 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे ( Pune ) जिल्ह्यातल्या घाट माथ्यावर 4 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्यार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या ( NDRF ) 2 तुकड्या दाखल होणार आहेत. पंचगंगेच्या ( Panchganga ) पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे. राधानगरी धरणात सुमारे 79 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातलं 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

सोलापूर ( Solapur ) शहर आणि जिल्ह्यात सायंकाळी चार नंतर पावसाला सुरुवात झाली. शहरी व ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. धुळे जिल्ह्यातही अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. येथे शेतकर्‍यांनी पेरणीच्या कामाला सुरूवात केली आहे. 55 टक्के भागात पेरणी पुर्ण झाली आहे. पुढील 8 दिवसांत 80 टक्के क्षेत्रावर हाईल असा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता