Verification: 4e7838d05962b884

Olympiad : भारताची 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांची कमाई

Spread the love

International Astronomy and Astrophysics Olympiad : जॉर्जिया इथं 15 ते 22 ऑगस्ट या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघानं सुवर्ण कामगीरी केली आहे. भारताने ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदके पटकावली आहेत.
यावेळी भारतीय संघातील प्रत्येकाने कमीतकमी एक पदक पटकविण्याची कामगीरी केली आहे. चंदीगडचा राघव गोयल, कोलकाता इथला मोहम्मद अख्तर आणि हैदराबादचा मेहुल बोराड यांनी सुवर्ण पदक तर गाझियाबादचा मलय केडिया आणि इंदोरच्या अथर्व महाजन यांनी रौप्य पदक जिंकले आहे. अशी माहिती मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रानं दिली.

International Astronomy and Astrophysics Olympiad ही जगातील उच्च-माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्राची आवड निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन होते. यंदाच्या स्पर्धेत 48 देशांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते.

International Astronomy and Astrophysics Olympiad
International Astronomy and Astrophysics Olympiad

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ