Verification: 4e7838d05962b884

आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना | International Marathi Forum

Spread the love

विदेशामध्ये मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची ( International Marathi Forum ) स्थापना केली आहे.

या मंचा अंतर्गत विदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना यासर्वांना राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणण्यात येईल. यासाठी समन्वयक आणि उपसमन्वयकांची नेमणूक करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या ( State Marathi Development Society ) संचालकांनी दिली आहे.

दरम्यान, विविध देशातील अनिवासी मराठी भाषिक, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था, मंडळांचा परस्परांबरोबर संपर्क घडवणं, तसंच विविध देशात मराठी भाषेच्या प्रचार – प्रसार, जतन- संवर्धनासाठी होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेला सादर करणे. ही जबाबदारी या समन्वयकांना देण्यात आली आहे.

International Marathi Forum
International Marathi Forum