Verification: 4e7838d05962b884

IPL 2022 : Hyderabad win by 8 wickets | हैदराबादचा गुजरातला ८ गडी राखून दणका

Spread the love

IPL 2022 : केन विलियम्सन याने केलेल्या अप्रतिम फलंदाजीच्या बळावर हैदराबादने गुजरातच्या घोडदौडीला लगाम घातला आहे. सोमवारच्या लढतीत हैदराबादने गुजरातला ८ गडी राखून दणका दिला. विजयासाठी ठेवलेले १६३ धावांचे लक्ष्य त्यांनी १९.१ षटकांतच पार केले. त्यांनी १६८ धावा केल्या. त्यामुळे चार सामन्यांतून हैदराबादचे चार गुण झाले असून यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातला प्रथमच पराभवाचा धक्का बसला आहे. विजयाची हॅट्रिक नोंदवलेल्या गुजरातचे चार सामन्यांतून सहा गुण झाले आहेत. या आधीच्या सामन्यात हैदराबादने चेन्नईला आठ गड्यांनी दणका दिला होता.

अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विलियम्सन यांनी ६४ धावांची खणखणीत सलामी दिली. त्यात अभिषेकचा वाटा होता ४२ धावांचा. तेराव्या षटकात हार्दिक पंड्याला विलियम्सनने लागोपाठ दोनदा सीमारेषेबाहेर भिरकावून दिले. १३.१ षटकांचा खेळ झाला तेव्हा हैदराबादची धावसंख्या होती १ बाद १०४. दरम्यान मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे राहुल त्रिपाठी याला मैदान सोडावे लागले. त्यापूर्वी त्याने ११ चेंडूंत १७ धावा चोपल्या त्यात एक चौकार आणि एका षटकारासह. त्यानंतर केन विलियम्सन मोक्याच्या क्षणी बाद झाला. हार्दिक पंड्याने त्याला टिपले. केनने ४६ चेंडूंत ५७ धावा करताना दोन चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. अभिनव मनोहर मैदानात उतरला. त्याने २१ चेंडूंत ३५ धावांची घणाघाती खेळी करताना ५ चौकार व १ षटकार हाणला. पंड्याने ४२ चेंडूंत नाबाद ५० धावा केल्या.

हैदराबादचा गुजरातला ८ गडी राखून दणका
हैदराबादचा गुजरातला ८ गडी राखून दणका