Verification: 4e7838d05962b884

TET EXAM घोटाळा : 7 हजार 874 उमेदवारांची प्रमाणपत्रं रद्द

Spread the love

टीईटी ( TET ) अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातल्या 7874 उमेदवारांची प्रमाणपत्रं रद्द करण्यात येणार आहे. या सर्व उमेदवारांना यापुढे TET बसता येणार नाही. जानेवारी 2020 मध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यात एकूण 16 हजार 592 उमेदवार उत्तीर्ण झाले. याचा निकाल 8 महिन्यांनी लावला होता.

दरम्यानच्या काळात परीक्षा परिषदेतले अधिकारी-कर्मचारी, एजंट, परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचे संचालक यांच्यात काळाबाजार झाला. TET निकालात मोठे फेरफार करण्यात आले. अनुत्तीर्ण उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आल्याचं, स्पष्ट करण्यात आले आहे.