Verification: 4e7838d05962b884

पंतप्रधान नरेंद्र मोदी ; 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष | PM Narendra Modi; President of the 13th BRICS Summit

Spread the love

ब्रिक्सने न्यू डेव्हलपमेंट बँक, आकस्मिकता राखीव व्यवस्था आणि ऊर्जा संशोधन सहकार्य | BRICS cooperates with the New Development Bank, contingency reserves and energy research

PM Modi chairs BRICS Summit says BRICS an influential voice for emerging economies of world
PM Modi chairs BRICS Summit

13 वी ब्रिक्स शिखर परिषद | BRICS summit council –

पंतप्रधान मोदी हे ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले, की “ब्रिक्सने गेल्या दीड दशकांमध्ये अनेक कामगिरी केली आहे आणि जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी हा एक प्रभावी ठरत आहे.” यंदाच्या 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षीय भाषण करताना, दि. 09 रोजी आभासी स्वरुपात मोदी म्हणाले, “हे व्यासपीठ विकसनशील देशांच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरले आहे.”

13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेची थीम | Theme of the 13th BRICS Summit –

 ‘BRICS@15: Intra-BRICS cooperation for continuity, consolidation and consensus

ब्रिक्सने न्यू डेव्हलपमेंट बँक, आकस्मिकता राखीव व्यवस्था आणि ऊर्जा संशोधन सहकार्य यांसारख्या अनेक मजबूत संस्था सुरू केल्या आहेत. अशी माहिती मोदी यांनी दिली. पुढे ते म्हणाले, “हे सुनिश्चित केले पाहिजे की ब्रिक्स पुढील 15 वर्षांमध्ये अधिक उत्पादनक्षम बननार आहे. त्याचबराबर भारताने आपल्या नेतृत्वासाठी जी थीम निवडली आहे, ती म्हणजे-‘ब्रिक्स 15 वर-सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य.”

पंतप्रधान म्हणाले, अलीकडेच 1 ली ब्रिक्स डिजिटल आरोग्य परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी हे एक अभिनव पाऊल आहे. तसेच ते म्हणाले, नोव्हेंबरमध्ये पाच सदस्य देशांचे जलसंपदा मंत्री ब्रिक्स स्वरूपात पहिल्यांदा भेटतील. यावेळी मोदी म्हणाले, ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती योजना नुकतीच स्वीकारली गेली आणि सदस्य देशांच्या अंतराळ संस्था देखील रिमोट सेन्सिंग उपग्रह नक्षत्रांमध्ये एकत्र काम करत आहेत.

ते म्हणाले, सदस्य राष्ट्रांच्या सीमाशुल्क विभागांमधील चांगल्या सहकार्यामुळे आंतर-ब्रिक्स व्यापार सुलभ होईल. सर्व सदस्यांचे आभार मानून मोदी म्हणाले, भारताला ब्रिक्सच्या अध्यक्षतेदरम्यान सर्व सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळाले आहे.

13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थीत देश | Countries attending the 13th BRICS Summit –

या बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ब्राझीलचे जैर बोल्सोनारो उपस्थित आहेत. ब्रिक्स जगातील पाच सर्वात मोठ्या विकसनशील देशांना एकत्र आणते – जागतिक लोकसंख्येच्या 41 टक्के, जागतिक जीडीपीच्या 24 टक्के आणि जागतिक व्यापाराच्या 16 टक्के भागांचे प्रतिनिधित्व करते.

13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी | Prime Minister Narendra Modi presides over the 13th BRICS Summit –

2021 मध्ये भारताच्या चालू असलेल्या ब्रिक्सच्या अध्यक्षतेचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अध्यक्ष स्थानी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 2016 मध्ये गोवा शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. यावर्षी ब्रिक्सचे भारतीय अध्यक्षपद ब्रिक्सच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त आहे. या परिषदेत अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर व्यापक लक्ष केंद्रित केले जाण्याची अपेक्षा आहे.

Who is the President of the 13th BRICS Summit ?

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी

What is the theme of the 13th BRICS Summit ?

 ‘BRICS@15: Intra-BRICS cooperation for continuity, consolidation and consensus

Which Countries attending the 13th BRICS Summit ?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ब्राझीलचे जैर बोल्सोनारो

More News –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *